#U19CWC : अफगाणिस्तानचा दक्षिण आफ्रिकेवर विजय

किम्बेर्ली (द.आफ्रिका) : शफिकुल्ला गाफरीच्या प्रभावी गोलंदाजीनंतर इब्राहिम आणि इम्रानच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान द.आफ्रिकेचा ७ गडी राखून पराभव केला आहे.

दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना २९.१ षटकांत सर्वबाद १२९ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानच्या शफिकुल्ला गाफरी याने १५ धावा देत ६ तर नूर अहमदने ४४ धावा देत २ गडी बाद करत आफ्रिकेच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. द. आफ्रिकेकडून ब्रायस परसन्स ४० आणि गेराल्ड कोएत्झीने ३८ धावांची खेळी केली.

त्यानंतर विजयासाठीचे १३० धावांचे आव्हान अफगाणिस्तानने २५ षटकांत ३ बाद १३० धावा करत पूर्ण केले. अफगाणिस्तानकडून फलंदाजीत इम्रानने ५७ तर इब्राहिम झर्दानने ५२ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत क्लोएतने २० धावा देत २ गडी बाद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here