पोर्ट एलिजाबेथ : बेन स्टोक्स आणि ऑली पोपच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने चार कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील तिस-या सामन्यात पहिला डाव ९ बाद ४९९ वर घोषित केला. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात फलंदाजी करताना दुस-या दिवसअखेर १८ षटकांत २ बाद ६० धावा अशी मजल मारली असून ते अजूनही ४३९ धावांनी पिछाडीवर आहेत.
STUMPS| 🇿🇦60/2
That will be it! The officials have given Stumps on Day 2.
🎥Recapping day 2… #ProteaFire #SAvENG pic.twitter.com/ZC0Y8SVmQn
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 17, 2020
इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिला डाव १५२ षटकांत ९ बाद ४९९ धावसंख्येवर घोषित केला. इंग्लंकडून फलंदाजीत ऑली पोपने नाबाद १३५, बेन स्टोक्स १२९, सॅम करन ४४, जक क्राॅल ४४, मार्क वुड ४२ आणि डोमिनिक सिबलीने ३६ धावांची खेळी केली.
DECLARATION | 🏴 499-9
The Three Lions have decided to call it a day as they declare⛔️
@keshavmaharaj16 the stand out bowling performer, picking a 5-fer🖐️Play will resume shortly 🏏
#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/hH4rVD2Ufl
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 17, 2020
द. आफ्रिकेकडून गोलंदाजीत पहिल्या डावत केशव महाराजने ५-१८०, कगिसो रबाडाने २-९७, ऐनरिक नाॅर्टजेने १-९७ आणि डेन पॅटरसनने १-६२ गडी बाद केले.
RAIN STOPS PLAY| 🇿🇦60/2
The light meter is out and the umpire is checking it. And wait a minute, it has started to rain out on the ground! The players are going off the ground.#ProteaFire #SAvIND pic.twitter.com/AChA5dkVXv
— Proteas Men (@ProteasMenCSA) January 17, 2020
त्यानंतर प्रत्युत्तरात द.आफ्रिकेने दुस-या दिवसअखेर पहिल्या डावात १८ षटकांत २ बाद ६० धावा केल्या आहेत. पीटर मालन ज्यु. १८ आणि जुबैर हमजा १० धावा काढून बाद झाले. इंग्लंडकडून गोलंदाजीत डोमनिक बेसने २ गडी बाद केले. दुस-या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऐनरीक नाॅर्टजे शून्यावर तर डीन एल्गर ३२ धावांवर खेळत होता.