-->

मध्यप्रदेशात दोन महिला नक्षलवादी ठार

बालाघाट – मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील जंगल परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवादी ठार झाल्याचे वृत्त आहे.

त्यातील एक महिला नक्षलवादी शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमाराला झालेल्या चकमकीत ठार झाली तर दुसरी महिला नक्षलवादी आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमाराला झालेल्या चकमकीत मारली गेली.

त्या महिलांची ओळख पटली आहे. त्यातील एक महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील आहे तर दुसरी छत्तीसगड राज्यातील आहे. किरनापुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत या दोन्ही चकमकी झाल्या.

पोलिस अधिक्षक अभिषेक तिवारी यांनी पत्रकारांना सांगितले की, या जंगल परिसरात काही माओवादी लपले असल्याची खबर पोलिसांना गुप्तचर विभागाच्या सूत्रांनी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या भागाची नाकाबंदी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.