मुंबई – मुंबईमधील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या हॉटस्टार अर्थात इरॉटीक क्वीन पूनम पांडेनं तिच्या ट्वीटर हॅंडलवर प्रसिद्ध केलेल्या हॉट व्हिडीओला सध्या सर्वाधिक प्रसिद्धी मिळत आहे. अवघ्या पाच सेकंदाच्या या व्हिडीओला अवघ्या काही तासांत 50 हजारपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या असून क्षणोक्षणी हा आकडा वाढतच आहे.
https://twitter.com/iPoonampandey/status/1337336101933989889
या व्हिडीओसोबत पूनमनं केवळ एक स्मायली पोस्ट केली असून, सदर व्हिडीओमध्ये ती सेमीन्यूड हॉट अंदाजात दिसते आहे. अनेकांनी हे ट्वीट रिट्वीट केले असून, काही जणांनी ते फेसबुकवर शेअरही केले आहे.
एखाद्या स्वादिष्ट डिशमध्ये जसे मीठाचे महत्त्व असते, तशा प्रकारच्या भूमिका मला करायला आवडतात, असे सांगताना पूनम म्हणते की, मला अनेक सिनेमा आणि वेबसिरीजकडून विविध भूमिकांच्या ऑफर्स येत असतात. पण त्यांना फक्त माझ्याकडून हॉट किंवा बेडसीन्सचीच अपेक्षा असते. पूर्ण भूमिकाच एकांगी असेल, आणि त्यात आव्हानात्मक काम नसेल, तर अशा भूमिकांत आपल्याला रस नसल्याचे पूनम सांगते.
लॉकडाऊनच्या काळातही पूनमने नागरिक संचारबंदीला विरोध करताना सरकारी आदेशांची खिल्ली उडवणारे व्हिडीओ पूनमने पोस्ट केले होते. हॉट फोटोशूट आणि सेक्सी व्हिडीओजच्या माध्यमातून सातत्याने चर्चेत राहणे, हाच पूनमचा आता मुख्य व्यवसाय बनला आहे.