तीर्थक्षेत्र भुलेश्वर घाटातील खळबळजनक घटना
यवत : दौंड तालुक्यात असणाऱ्या भुलेश्वर घाटामध्ये एका दुचाकीस्वारास लुटून त्याच्याकडील ६५०० (सहा हजार पाचशे)रुपयांचा एवज लुटल्याची घटना घडली आहे.याबाबत गणेश शिवाराम लोखंडे वय.२४ वर्ष रा. पोंढे,ता. पुरंदर यांनी याबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत यवत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि,गणेश लोखंडे हे भांडगाव ता. दौंड येथील पारख कंपनीत कामाला असून रात्री ११ वाजनेच्या सुमारास कंपनीमधून भांडगाव वरून पोंढे येथे घरी जात असताना भुलेश्वर घाटात पाठीमागून येणाऱ्या एका दुचाकीवरून तिघेजण येऊन त्यातील एकाने लोखंडे याच्या दुचाकीस पाठीमागून लाथ मारून त्याला खाली पाडून त्याला दमदाटी करत त्याच्या पॅन्टच्या खिशातील पैसे आणि मोबाईल बळजबरीने घेऊन ते पसार झाले.
घडलेला प्रकार त्यांनी घाटाखाली येऊन त्यांच्या मित्रास सांगितला असता त्यांनी घाटात शोधाशोध केली असता तिघेजण एका झूडपाआड लपलेले दिसले परंतु लोकांची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत दुचाकी जागीच सोडून तिघांनी पलायन केले.
गुन्हामध्ये वापरलेली दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय नागरगोजे करत आहेत.