नगर – सावेडी तसेच उपनगरातून दुचाकी चोरींच्या प्रमाणात वाढ होत असून तोफखाना पोलीस आरोपीच्या त्यांच्या शोधात होते. त्याचाच एक भाग म्हणून शहरामधून दुचाकी चोरी करणाऱ्या एकाला तोफखाना पोलिसांनी जेरबंद केले असून त्याच्याकडून सात दुचाक्या हस्तगत करण्यात आले.
किरण बन्सी दळवी (वय- 26 रा. निंबळक) असे जेरबंद केलेल्या चोरट्याचे नाव आहे. यशोदानगरचा भाजी बाजार चोरट्यांकडून टार्गेट केला जात होते. याची दखल घेत तोफखाना पोलिसांचे पथक चोरट्यांचा शोध घेत असताना दळवी विना नंबरच्या दुचाकीवरून फिरत असताना मिळून आला. त्याच्याकडे विचारणा केली असता त्याने 8 जानेवारीला पाइपलाइनरोड परिसरातून दुचाकी चोरल्याचे सांगितले.
पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने शहरातून अनेक दुचाकी चोरी केल्याची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून सात दुचाकी हस्तगत केल्या आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.