नगर कल्याण महामार्गावर ओतूर हद्दीतील घटना
ओतूर (पुणे) – ओतूर (ता. जुन्नर) हद्दीत अहमदनगर-कल्याण महामार्गावर कोळमाथा येथे पिंपळगाव जोगे कालव्यानजीक फॉर्च्यूनर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 25) दुपारी दिडच्या सुमारास घडली.
ईश्वर रमेश मेंगळ (वय 25, रा. बोटा, ता. संगमनेर) असे या उुचाकीस्वाराचे नाव आहे. आळेफाटा बाजूकडून कल्याण बाजुकडे जाणाऱ्या फॉर्च्यूनर कारने (एमएच 14 एफएक्स 6330) आळेफाटा बाजुकडे जात असलेल्या दुचाकीला (एमएच 12 जेपी 7327) समोरासमोर धडक दिली. फोर्च्यूनर चालक नेताजी सोनुबा जगताप (रा. मारुंजी, ता. मुळशी) यास ओतूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.