मांडवगण फाराटा -तांदळी (ता. शिरूर) येथील मंथन प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळसकरवाडीच्या चौथीच्या दोन विद्यार्थ्यांनी राज्यात गुणवत्ता यादीत 7 वे स्थान पटकावले आहे. दिव्या संजय कळसकर हिने 300 पैकी 288 गुण व अश्विन दीपक सोनवणे याने 300 पैकी 288 गुण मिळवत यादीत सातवे स्थान मिळवले आहे.
पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना मंथन स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट केले जाते. सर्व विद्यार्थ्याना स्वाती ठाणगे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमापैकी स्पर्धा परीक्षा या उपक्रमाचे हे यश आहे, असे मुख्याध्यापक नवनाथ काळे यांनी सांगितले. यशस्वी विद्यार्थ्यांचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, घोडगंगाचे संचालक प्रा. सुभाषराव कळसकर यांनी अभिनंदन केले आहे