महाराष्ट्राचे दोन विद्यार्थी इटलीत अडकले

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे अमरावती जिल्ह्यातील दोन विद्यार्थी इटलीत अडकून पडले आहेत. प्रणव वेराळे आणि  सूरज बंडले अशी या दोन विद्यार्थ्यांची नवे आहेत. या दोघांनाही इटलीच्या मिलान विमानतळावर  बुधवारपासून थांबून ठेवले आहे.

त्यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना संपर्क साधून सरकारतर्फे मदत करण्याची मागणी केली आहे. नागपुरात राहणारे प्रणव यांचे नातेवाईक गोविंद वेराळे यांनी सांगितले की, कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे  त्या दोघांनी 2 फेब्रुवारीला एअर इंडियाचे  तिकीट काढले होते.

तिकिट बुक करताना विमान कंपनीने त्यांना कोणतेही सूचना दिलेली नव्हती परंतु बुधवारी मिलान विमानतळावरून जाताच त्यांना विमान कंपनीने ‘कोरोना व्हायरस ना झाल्याचे प्रमाणपत्र’ सादर करण्यास सांगितले आहे.

दरम्यान महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे. पुण्यात 100 हून अधिक जणांची चाचणी करण्यात आली असून त्यांचे अहवाल येणे बाकी आहे.

तीन दिवसांपूर्वी अमेरिकेतून आलेला एक संशयित रुग्ण नागपूर रुग्णालयात दाखल आहे. या रूग्णचा अहवालही येणे बाकी आहे. त्याचवेळी मुंबईत 2 जणांना कोरोना विषाणू झाल्याचे आढळले आहे.

भारतामध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूच्या रुग्णाची संख्या 60 पेक्षा जास्त झाली आहे. सरकारने एक ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी जारी केली असून नागरिकांनी परदेशात जाण्याचे टाळावे असे सांगितले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.