जम्मू – पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या दोन जणांना जम्मू काश्मीरातील राजौरी जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले नौशेरातील आहेत. यातील एक जण भारतीय लष्करासाठी हमाल म्हणून काम करतो दुसरा त्याचाच एक नातेवाईक आहे.
लष्कराच्या एका संयुक्तपथकाला या इसमाच्या हेरगिरीच्या संबंधातील महिती मिळाल्यानंतर लष्कराने त्यांना ताब्यात घेतले. राजौरी हा सीमावर्ती भाग आहे या भागातील लष्करी व्यवस्थेच्या संबंधातील व्हिडीओ तयार करून या दोघांनी पाकिस्तानला दिले असल्याचे सिद्ध झाले आहे.
त्यासाठी त्यांना पाकिस्तानकडून पैसे मिळत असत. या दोघांना हेरगिरी विरोधी कायद्याच्या विविध कलमांखाली अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले दोघेही जण नौशेरा येथील राहणारे आहेत. तथापि त्यांची अन्य ओळख मात्र अजून जाहीर करण्यात आलेली नाही.