पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि निलेश प्रकाश निकम यांच्या वतीने कर्नाटक येथे महापुरुषांच्या पुतळ्याची विटंबना केल्याच्या घटनेचा निषेध करण्यात आला. कर्नाटकला पुण्याहून जाणाऱ्या कर्नाटक टुरिझमच्या बसेवर काळ्या शाईने निषेध लिहून व तसेच बसवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कर्नाटक सरकारबदल ‘जाहीर निषेध’चे फलक लावले.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यावर त्यांनी माफी मागितली नाही तर कर्नाटकमध्ये जाणाऱ्या सर्व बसेस रोखल्या जातील, असा इशाराही निलेश प्रकाश निकम यांनी दिला.
यावेळी स्वप्निल जोशी, अजय झडपे, कुणाल शिंदे, विनोद परदेशी, कुणाल हेंद्रे,अमित साळुंखे, साहिल कंट्रोल, विकी कुसाळकर, निखिल जोशी, राहुल धोत्रे यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.