पिंपरी – सांगवी येथील जिल्हा रुग्णालयात करोनाने दोन ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू झाला. करोनामुक्त झालेल्या 7 जणांना आज (दि. 28) घरी सोडण्यात आले.
सानेवाडी-औंध येथील 78 वर्षीय पुरुषाचा गुरुवारी (दि. 28) करोनाने मृत्यू झाला. तर, पाटे गाव- नारायणगाव येथील 67 वर्षीय ज्येष्ठ महिला बुधवारी (दि. 27) करोनाने दगावली. करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये 6 पुरुष आणि 1 महिला रुग्णाचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे सौदागर, नवी सांगवी तसेच कर्नलवाडी (ता. पुरंदर), कवठे येमाई (ता. शिरूर), पेरणे येथील हे रुग्ण आहेत. रुग्णालयामध्ये सध्या 12 जणांवर उपचार सुरू आहे. त्यातील 4 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पुणे ग्रामीण परिसरातील एका संशयित रुग्णाला आज उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयातून आत्तापर्यंत 724 जण बरे होऊन घरी गेले आहेत. 683 जणांना होम क्वारंटाइन केले आहे. तर, एकूण 167 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.