मुंबई मुंबईतील तीन परिचारिकांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर वरळीतील कोळीवाड्यात आठ बाधित सापडले असून त्यांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या ३६ जणांना शोधण्यात यश आले आहे.
मुंबईच्या वोखार्ड रुग्णालयातील एका पुरुष आणि एका महिला परिचारिकेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. एक ७० वर्षीय रुगफणाच्या ते संपर्कात आले होते. ते दाखल झाले तेंव्हा त्यांना कोरोनाची लक्षणे दिसत नव्हती मात्र नंतर त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली रुग्णालयाचे व्हॉइस प्रेसिडेंट डॉक्टर प्राग रिंदानी म्हणाले, या दोघांची प्रकृती आता ठीक असून लवकरच त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल,अशी अपेक्षा आहे.
जसलोक रुग्णालयात एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाली असून मात्र ताफ्या सेवा करत असलेल्या कोणत्याही रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणे नव्हती. अथवा परदेशीं जाऊन आलेल्या कोणाच्या त्या संपर्कात त्या आल्या नव्हत्या.
वरळी कोळीवाड्यात कोरोनाचे आठ बेडीत सापडले आहेत..तर चाफ्याच्या निकटच्या संपर्कात आलेल्या ३६ जणांना शोधण्यात आले असून त्यांची चाचणी घेण्यात आली आहे. तेथे डोक्याच्या पातळीवरून कार भागात विभाजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या वाढत्या संख्येला आटोक्यात ठेवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व २२७ वार्ड मध्ये भरारी पथक नेमण्याची घोषणा केली आहे. .