न्यूयॉर्क : प्लॅस्टिकच्या आच्छादनाचा गुंवाळलेले मृतदेह… वातानुकूलित कंटेनरच्या बनवलेल्या शवागरे … … ते हाताळणारे आरोग्य कर्मचारी…. हे चित्र होते न्यूयॉर्कमधील रुग्णालयांचे … कारण कोरोनामुळे मरण पावणाऱ्यांच्या संख्येत तेथे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
हि साथ आणखी पसरू नये यासाठी आरोग्य कर्मचारी काळजी घेत आहेत.पण अद्याप त्यांना यश आले नाही.अमेरिकेतील साथीचा केंद्रबिंदू बनलेल्या न्यूयॉर्कमध्ये शवागरांची कमतरता जाणवत आहे. तसेच मोठ्या संख्येने होणाऱ्या मृत्यूमुळे शवागारांमध्ये जागा नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे केंद्रीय आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेने ८६ वातानुकूलित ट्रकची शवागरे बनवली आहेत.
.
मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अतिरिक्त व्यवस्था करूनही अद्याप अमेरिकेत एक हजार मृतदेह पडून असल्याचे चित्र आहे. कल्पनातीत समस्या पुढे ठाकल्याने वाढत्या मृतांच्या संख्येसाठी शवागरांची क्षमता वाढवण्याची गरज रुग्णालये व्यक्त करत आहेत. एकट्या न्यूयॉर्क शहरात शुक्रवारी मृतांची संख्या ४५० होती. ती सोमवारी सकाळी दोन दिवसांत ९३२ वर पोहोचली आहे.