रायपुर: छत्तीसगड जिल्ह्याच्या कंकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले. गुरूवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री मालेपाडा आणि मुरूनार गावांच्या दरम्यान असलेल्या जंगलात ही चकमक झाली. हा भाग रायपुर पासून दोनशे किमी अंतरावर आहे. या जंगलाच्या परिसरात जिल्हा राखीव पोलिस दलाचे जवान गस्त घालत असताना त्यांना या नक्षलवाद्यांचे अस्तित्व तेथे आढळून आले.
पोलिसांना ज्या ठिकाणी संशयास्पद हालचाली दिसून आल्या त्यांनी तिकडे कुच केल्यानंतर त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनीही तेथे चौफेर गोळीबार केला. त्यात हे दोन जण ठार झाले. त्यांची ओळख अजून पटलेली नाही. त्यांच्या जवळ दोन एसएलआर रायफली आणि आणि अन्य दोन वेगवेगळ्या बनावटीच्या रायफली आढळून आल्या. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.