कोपरगाव (प्रतिनिधी): गेल्या दोन महिन्यांपासून करोनाच्या भितीने कोपरगावचा सराफ बाजार ओस पडला होता. सुवर्ण व्यवसायीक व त्यांच्यावर विसंबून असलेल्या कारागिरावर उपासमारीची वेळ आली होती. दोन महीणे ठप्प असलेली सोन्याची दुकाने काही अटी शर्तीवर ठराविक दिवसांसाठी आठवड्यातुन दोन दिवसासाठी उघडण्याची परवानगी स्थानिक प्रशासनाने दिल्यानंतर कोपरगावच्या सराफ बाजारात सोने चांदी खरेदी करण्या बरोबर मोडतोड करण्यासाठी नागरीकांची गर्दी झाली होती.
केवळ दोन दिवसात शहराती १५० सराफी दुकानातून अंदाजे १५ कोटीची उलाढाल झाल्याची माहीती सराफ बारातील काही व्यापाऱ्यांनी दिली. अडचणीच्या काळात जवळचे सोने कामाला येते ही संकल्पना फार जूनी आहे. त्याचाच प्रत्येय या दोन दिवसात आला. कोपरगावच्या सराफ बाजारातील सर्व दुकाने ग्राहकांच्या गर्दीने भरलेली होती. काही दुकानात सामाजीक अंतर ठेवण्याच्या अटीवरती बाहेर बसावे लागले तर कांहींनी गर्दी करुन सोने – चांदी खरेदी विक्रीचा विक्रम केला. सोन्या चांदीचे दर गगनाला भिडले तरी खरेदी विक्रीचा उच्चांक वाढलेला दिसुन आला.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या किमतीत वाढ झाली. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किंमती आतापर्यंतच्या सर्वाधिक स्तरावर पोहोचल्या आहेत. शुक्रवारी सोन्याची किंमत प्रति तोळा ४७ हजार ६७ रुपयांच्या दर ऐतिहासिक स्तरावर पोहोचला होता . आता यामध्ये ८८१ रुपयांनी वाढ होऊन प्रति तोळा सोन्याचा दर ४७ हजार ९४८ रुपये इतका झाला आहे.
सोमवारी विक्रमी गर्दी झाली होती. दोन महीण्याच्या प्रतिक्षेनंतर सराफ बाजार उघडला आणि दुकानं सुरु होताच कोपरगाकरांनी एकच गर्दी केली. एकाच दिवसात अनेटांनी लाखो रुपयांचं सोनं खरेदी करण्यात आलं आहे. शहरातील सराफ बाजारात दोन दिवसात तब्बल १५ कोटी पेक्षा ज्यास्त उलाढाल झाली. सोन्याचे दर वाढले तरी नगरीकांचा सोन्याचा मोह काही कमी झाला नाही. करोनामुळे दोन महीने नागरीक घरात बसुन असल्याने सर्व व्यवहार बंद होते आर्थीक उलाढाली बंद होत्या. अनेक आर्थीक आडचणी आल्या. दैनंदिनी व्यवहार बंद होते. नागरीकांकडे पैसा नाहीत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचे भाव वाढलेले. देशात आर्थीक स्थिती बिघडलेली.या परिस्थितीत सराफी व्यवसाय करणारे चिंतेत होते. ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो कि नाही
दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सराफ व्यावसायिकांनी दुकानं उघडल्यानंतर ग्राहकांची संख्या रोडावेल, लोक सोने खरेदी करणार नाहीत असे अंदाज अनेकांनी बांधला होता पण कोपरगावकरांनी ते सगळे अंदाज फोल ठरवत सोन्याची लयलूट केली.
शेअर्स बाजारात होणारे कमालीचे चढउतार, बाजारपेठेतील मंदीची परिस्थिती, बँकाच्या ठेवींवरील झपाट्याने घसरत चाललेले व्याजदर, बँकाबाबत निर्माण झालेली काहीशी अविश्वासाची भावना तसेच, लग्नसराईच्या मोसममध्ये सोने खरेदीचा विचार यामुळे सोन्याला चांगली मागणी वाढल्याची माहीती कोपरगाव चे प्रसिध्द सोने व्यापारी निलेश उदावंत यांनी दिले.येत्या काळात पुन्हा सोन्या चांदीचे दर वाढण्याची शक्यता आहे. करोनाचा परिणाम जागतीक सोने बाजारावर जाला असुन बाहेरच्या देशातून येणारे सोने प्रवास बंदी व इतर कारणामुळे भारताच्या बाजारपेठेत अपेक्षीत प्रमाणात उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.त्याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना बसणार आहे.असेही ते म्हणाले.
सध्यातरी नागरीक सोन्याच्या मोहात आहेत हे दोन दिवसाच्या विक्रमी गर्दीवरुन व झालेल्या उलाढाली वरून स्पष्ट होते.