नगर – नगर-पुणे महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलावर गुरूवारी रात्री नऊच्या सुमारास एसटी बस व मालट्रक यांची समोरामसमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोघे मरण पावले तर अकरा जखमी झाले आहेत. या भीषण अपघतात अश्रू केरु बोबडे (बय 60 ,रा. पिंपळगाव आवळा, ता, जामखेड), गणेश शांतालिंग साखरे (बय 30, रा, हंडीजोडी, ता. भूम) मयत झाले.
जामखेड- मुंबई ही बस नगरहून पुण्याच्या दिशेने जात असताना समोरुन येणारी मालट्रक यांची रेल्वे उड्डाणपुलावर समोरासमोर जोराची धडक झाली. अपघाता दरम्यान मोटार सायकलवरील केडगाव येथील युवकाला जोरदार धडक बसून तो पुलावरुन खाली फेकला गेला.त्यात त्याचे दोन्ही पाय निकामी झाले असून एसटी बस चालक व वाहक जखमी झाले आहेत.
रॉजेंद्र मारुती पवार (वय 52, रा.जामखेड), जॉर्ज मार्कस गायकवाड (वय26, रा. बुरुडगाव, नगर ), प्रसाद धनंजय चव्हाण ( वय 23, रा. चांदे कसारे, कोपरगाव), एकनाथ सुग्रीव रोडे ( वय 24, रा वैजा,पाटोदा-आष्टी), शूभम किशोर दगडे (वय 23, रा. शिरूर कासार, जि. बीड), अकबर जैनुद्दीन शेख( वय 74 , रा. शिरूर, जि.पुणे), शालन महादेव साठे (वय45, रा. औंध, पुणे), महादेव दादू साठे (वय 58, रा. औंध,पुणे ), गणेश सुभाष लष्कर (वय 30, रा. केडगाव ),भरत काकासाहेब काकडे (वय 30, रा.किन्ही ता. आष्टी, जि.बीड), मंगेश गंगाधर राणे (वय 40 , रा. विद्यानगर, पुणे )अशी जखमींची नावे आहेत.
जखमींवर जिल्हा व खाजगी रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघातामधील तिघांची प्रकृती गंभीर आहे. त्यातील एका युवकाला पुढील.उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर ट्रकचालकाने पलायन केले. यावेळी पुलाच्या कठड्याला एसटी बसची जोरदार धडक बसली.
नगर सेवक दिपक खैरे ,मनोज कोतकर यांच्या सह अनेक नागरीकांनी मदत कार्य केले अपघाताची माहिती समजताच कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक विकास वाघ यांच्या सह पोलीस कर्मचारी आणि जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांचे पथक घटना स्थळी दाखल झाले.यावेळी वाहतुक कोंडी झाली .त्यामुळे पुण्याहून येणारी वाहतुक बायपास मार्गे तर पुण्याकडे जाणारी वाहतुक केडगाव बायपास मार्गे वळविण्यात आली.