वेलिंग्टन- भारतातून न्यूझीलंडला परत गेलेल्या दोन भारतीय व्यक्तींना करोना विषाणू संसर्ग झाल्याचे आढळलले आहे.
न्यूझीलंडच्या आरोग्य मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, पहिल्या घटनेत भारतातून नुकतेच न्यूझीलंडला परत आलेल्या जोडप्याच्या दोन वर्षाच्या बालकाला करोना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर दुसऱ्या घटनेत एका 59 वर्षीय महिलेला करोना संसर्ग झाल्याचे आढळलेले आहे. ही महिला दिल्लीवरून 15 जूनला ऑकलंडला परत आली होती.
काही दिवसांपूर्वीच ब्रिटेनवरून आलेल्या दोन महिला करोना बाधित आढळल्या होत्या. त्या आजारी नातेवाईकाला भेटण्यासाठी आल्या होत्या. मात्र,र् 14 दिवसांचा क्वारंटाइन पूर्ण न करताच त्यांना बाहेर पडण्याची अनुमती देण्यात आली होती. याघटनेनंतर न्यूझीलंड सरकारने कडक पावले उचलत विदेशातून येणाऱ्या व्यक्तींसाठी 14 दिवसांचा क्वारंटाइन पूर्ण करण्याची सक्ती केली आहे. न्यूझीलंड सरकारने काही दिवसांपूर्वीच देश करोनामुक्त झाल्याची घोषणा केली होती.