निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांची टीका सुरू आहे. त्यात आता भाजपा नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर टीका केली आहे. त्यांनी खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा ही शिवसेनेची जुनी सवय आहे, असे म्हणत निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे. घटनेच्या चौकटीत राहून सरकार काम करेल, असे शिवसेनेकडून लेखी आश्वासन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी कॉंग्रेसच्या सहभागासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मागितले होते, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले होते. यावर बोलताना निलेश राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला.
कोणीही शिवसेनेला टपली मारून जातं हल्ली. शिवसेना पक्ष लिहून चाटून सत्तेत आला ह्यात काही नवल नाही. शिवसेना चाटूगिरी करूनच सत्तेत आली हे जग जाहीर आहे. खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा ही त्यांची जुनी सवय आहे. https://t.co/KdfUaeEQ2N
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 27, 2020
निलेश राणे यांनी ट्वीटरवरून शिवसेनेवर निशाणा साधला. कोणीही शिवसेनेला टपली मारून जातं हल्ली. शिवसेना पक्ष लिहून चाटून सत्तेत आला यात काही नवल नाही. शिवसेना चाटूगिरी करूनच सत्तेत आली हे जग जाहीर आहे. खोलीत दोन हाणा पण बाहेर साहेब म्हणा ही त्यांची जुनी सवय आहे, असे ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे. त्यांनी अशोक चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोटावर ट्वीटरवरून आपली प्रतिक्रिया दिली.
घटनेच्या चौकटीत राहून सरकार काम करेल, असे शिवसेनेकडून लेखी आश्वासन महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन होण्यापूर्वी कॉंग्रेसच्या सहभागासाठी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी मागितले होते. जे सरकार स्थापन होईल ते घटनेच्या चौकटीत काम करेल, असे आश्वासन शिवसेनेकडून घ्या, असे सोनिया गांधी यांनी आम्हाला सांगितले होते, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केले. आपण तीन पक्षाच्या सरकारच्या किमान समान कार्यक्रमाबद्दल बोललो, हा कार्यक्रम संविधानाला अनुसरून तयार केलेला आहे, त्याप्रमाणे सरकारचे काम चालले पाहिजे, अशी आपली भूमिका असल्याचे अशोक चव्हाण यांनी नंतर सांगितले.