लोणी काळभोर येथील घटना : आठ लाखांचा ऐवज लंपास
लोणी काळभोर -लोणी काळभोर येथे बंद असलेल्या दोन फ्लॅटचे दरवाजे तोडून चोरट्यांनी 35 तोळे दागिने, 974 ग्रॅम चांदी यासह 35 हजार रुपये रोख असा एकूण 7 लाख 71 हजार 400 रुपयांचा किमतीचा ऐवज लंपास केला आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केली आहे. यासंदर्भात पंकज मारूती जाधव (वय 29, रा. लोणीकाळभोर ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज जाधव यांना त्यांचा फ्लॅट फोडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर आपल्या फ्लॅट ठिकाणी दाखल झाले. आत जाऊन बेडरूमध्ये पाहिले असता आतमधील लाकडी कपाटाचे दरवाजे उघडे होते. आतील लॉकरमध्ये सोने, चांदीचे व रोकड लंपास झाल्याचे त्यांना दिसून आले. याच बिल्डिंगमधील तिसऱ्या मजल्यावर राहणारे शहानावज रफीक आतार यांचे फ्लॅट नं 14 मध्ये देखील अशाचप्रकारे चोरी झाली.
चोरट्यांनी 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 6 तोळे सोने व 4 ग्रॅम चांदीचे दागिने चोरून नेले आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लोणी काळभोर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिवाजी ननवरे
करीत आहेत.