Ghatkopar Hording Collapsed : मुंबईतील घाटकोपरमध्ये आज (दि. 13) एक होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अजून 20 ते 30 जण त्या होर्डिंग खाली अडकल्याचा संशय आहे. बचावकार्य अद्याप सुरु असल्याची माहिती, महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली आहे. या घटनेत 66 जण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Maharashtra | Ghatkopar hoarding collapse incident | Bhushan Gagrani, BMC Commissioner says, “We suspect 20-30 more people trapped under that hoarding which collapsed in Ghatkopar. A total of eight people died in the incident. Rescue is underway…” https://t.co/1fj9jFUY38 pic.twitter.com/NgMdKb46RQ
— ANI (@ANI) May 13, 2024
मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत –
मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारने प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून कडक कारवाई करण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
घटना कशी घडली ?
मुंबई भागात आज दुपारपासून वादळी वाऱ्यासह पाऊस सुरु झाला होता. वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर महाकाय होर्डिंग कोसळले. होर्डिंगखाली जवळपास 80 वाहनं अडकल्याची माहिती समोर आली होती. या होर्डिंगखाली 100 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यामध्ये अनेकजण जखमी झाले असून आत्तापर्यंत 50हून अधिक जणांना बाहेर काढले आहे.
Maharashtra | 54 people reported injured and over 100 feared trapped after a hoarding fell at the Police Ground Petrol Pump, Eastern Express Highway, Pantnagar, Ghatkopar East. Search and rescue is in process: BMC https://t.co/iFVxcHBQ4R
— ANI (@ANI) May 13, 2024
दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल –
दरम्यान, होर्डिंग कोसळतानाचा आणि त्यानंतर त्याखाली अडकलेल्या वाहनांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाकाय होर्डिंग असल्याचे दिसत आहे. त्या होर्डिंगखाली संपूर्ण पेट्रोलपंप झाकून गेला आहे. दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये त्या होर्डिंगखाली वाहने अडकल्याचे दृष्य दिसत आहे. ही दृष्य अंगावर काटा आणणारी आहेत. सदर दुर्घटनेत आतापर्यंत सुरुवातीला 3 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर 4 जण आणि आता सर्व मिळून 8 जण मृत्यू पावल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.