व्हिसा नसताना पाचगणीत वास्तव्य करणाऱ्या दोन इथोपियन नागरिकांवर गुन्हा दाखल

पाचगणी : पाचगणी येथे परदेशी नागरिक कायदा उल्लंघन प्रकरणी दोन परदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की इथोपिया देशातील नागरिक अब्देला महंमद गाल व ओमर महंमद गाल या दोघांच्या व्हिसाची मुदत संपली होती. मुदतवाढ करून घेणे आवश्यक होते.

मात्र, त्यांनी वैध व्हिसा नसताना पाचगणी येथील डिसोझा एज्युकेशन ट्रस्ट या ठिकाणी 15 ऑगस्ट 2020 ते 15 जानेवारी 2021 असे पाच महिने वास्तव्य केले म्हणून या दोघांनी परदेशी नागरिक कायदा 1946 ते कलम 14 (अ) (ब) चे उल्लंघन केल्याप्रकरणी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याची फिर्याद पोलीस काँस्टेबल वैभव शामराव भिलारे यांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पाचगणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार कदम व त्यांचे सहकारी करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.