सातारा -कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेली 75 वर्षांची महिला व 24 वर्षांचा युवक, हे दोन बाधित रुग्ण आज करोनामुक्त झाल्याने त्यांना आज रुग्णालयातून सोडण्यात आले आहे.
या दोन रुग्णांच्या 14 व्या 15 दिवसाच्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आले. ते करोनामुक्त झाल्याने आज रुग्णालयातून सोडण्यात आले.
कृष्णा चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा हॉस्पिटलचे डीन डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी पुष्पगुच्छ देऊन या करोनामुक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते. आतापर्यंत जिल्ह्यातील 122 जण पूर्णपणे करोनामुक्त होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.