एमआयडीसी पोलिसांची कारवाई 9 दुचाक्या घेतल्या ताब्यात
नगर – एमआयडीसी परिसरातून दुचाक्या चोरणारे दोघे एमआयडीसी पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या कडून 9 दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई बुधवार (दि.7) रोजी करण्यात आली.
आरोपी गणेश विठ्ठल आव्हाड (वय-20,रा. गजानन कॉलनी, नवनागापूर. ता. नगर.जि. अ.नगर), किरण बन्सी दळवी (वय-26, रा. निंबळक, ता. जि. अ. नगर) यांना ताब्यात घेतले आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांना मिळालेल्या माहितीनुसार एमआयडीसी परिसरातून होणाऱ्या दुचाक्यांची चोरी आव्हाड व दळवी यांनी केली असल्याची खात्रीशिर माहिती मिळाली.
त्यानुसार पोलीस अधीक्षक इशु सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधीकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बोरसे यांच्या पथकाने पोलीस परशुराम नाकाडे, संदीप चव्हाण, अनिल आव्हाड, किरण कोळपे, अ.गाडे यांच्या पथकाने सापळा रचवून आरोपीस मोठ्या शिताफिने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून विविध कंपनीच्या चोरीच्या 9 दुचाक्या असा आंदाजे 4 लाख 50 हजार मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.