मोठी टोळी उघड होण्याची शक्यता
पारनेर – तालुक्यामध्ये मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीचे सत्र सुरू होते. या दुचाकी चोरी करणाऱ्या चोराचा छडा लावण्यात पारनेर पोलिसांना यश आले आहे. पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना गुप्त बातमीद्वारा माहिती मिळाली की, आरोपी गिरजु रोहिदास चिकणे (रा.अक्कलवाडी, ठाकरवाडी) याने चोरऱ्याल्या दुचाकी गाड्यांचा शोध पोलीस विनोद बॉरगे, महेश आव्हाड, शिवाजी कवडे यांनी घेतला. या अटल चोराकडून विविध कंपनीच्या 15 दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहे.
मोटरसायकल चोरीमध्ये तालुक्यातून पहिली गाडी काही दिवसापूर्वी पत्रकार सनी सोनवळे यांची चोरीला गेली. त्यावेळी एक जण संशयित होता असे पोलिसांचे म्हणणे होते. त्यानंतर पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. कान्हूर येथून अजून दोन मोटरसायकल चोरीला गेल्या. त्यानंतर हे चोरी करणारे कान्हूर येथे गेले.
मद्यधुंद अवस्थेमध्ये तेथील लोकांच्यात वाद-विवाद घालत होते. त्यानंतर हे चोरी करणारे मोटरसायकल सोडून पळून गेले. तेथील लोकांनी पोलिसांना ही माहिती दिल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले.त्यानंतर त्यांना तिथे तपासादरम्यान आधार कार्ड मिळवून आले. त्यानुसार आरोपींचा तपास लावण्यात पोलिसांना सोपे गेले कान्हूर येथून असून दोन मोटरसायकल चोरून नेल्या पोलिसांनी पाठलाग केला.
असता त्या दोन मोटरसायकल रुई छत्रपती या ठिकाणी ते सोडून गेल्यानंतर मिळाल्या. त्यानंतर खडकवाडी येथील अक्कलवाडी या ठिकाणी हाणामारी झाली तिथे पोलिस पोहोचल्यानंतर 353 दाखल करण्यात आला. त्यावेळी आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी या मोटरसायकल चोरीबाबत उलगडा केला. दोन मोटरसायकल विहिरीत टाकले असून बाकी मोटरसायकल बाबत कबुली दिली आहे. अजून या मोटरसायकलच्या टोळीबाबत दोन ते तीन साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून मोठी टोळी उघड होण्याची शक्यता आहे.