पैसे देवून कोणालाही तुमच्या सोबत करता येते

अजित डोभाल यांच्या व्हिडीओवर गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू काश्‍मीरला केंद्र शासित प्रदेशाचा दर्जा देत कलम 370 हटवल्यानंतर आता देशातील वातावरण चांगलेच तापल्याचे दिसत आहे. कॉंग्रेसने पुर्वीपासूनच सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला असून वेळोवेळी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान, आज आझाद जम्मू आणि काश्‍मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दौऱ्यावर जाण्या अगोदर आझाद यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. पैसे देवून कोणालाही आपल्या सोबत करता येते असे म्हणत त्यांनी डोभाल यांच्या त्या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांचा बुधवारपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ते जम्मू -काश्‍मीरमधील सर्वसामान्य जनतेसोबत अत्यंत मनमोकळेपणाने वावरताना दिसत आहेत. तसेच रस्त्यावर उतरून त्यांनी तिथल्या जनतेसोबत जेवणदेखील केले. याच व्हिडीओवर गुलाम नबी आझाद यांनी टीका केली आहे. बुधवारी अजित डोभाल यांनी जम्मू-काश्‍मीरमधील जनतेसोबत चर्चा केली तसेच तिथे असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानांना देखील डोभाल यांनी संबोधित केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.