पुणे-नगर महामार्गालगत कासारी फाटा येथील घटना
शिक्रापूर (पुणे) -शिक्रापूर (ता. शिरूर) येथे पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या कासारी फाटा येथे कारचालक हॉर्न वाजवून पुढे गेल्याच्या कारणातून पाच जणांच्या टोळक्याने त्याला अडवून दोघा भावांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. पाचपैकी दोघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
निलेश बाळू गायकवाड (रा. मुखई, ता. हवेली) व निखील विजय पलांडे (रा. कोंढापुरी, ता. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यांसह तीन अनोळखी जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत गोरक्ष बाबाजी बोरकर (रा. इंद्रायनी नगर भोसरी, पुणे; मूळ रा. वडझिरे, ता. पारनेर) या फिर्याद दिली. नगर महामार्गावरून गोरक्ष बोरकर व त्यांचा भाऊ दीपक बोरकर हे कारमधून (एमएच 14 जीए 6532) पारनेरकडे जात असताना त्यांच्या समोर आरोपीांची कार (एमएच 12 आरके 0326) चाललेली होती. बोरकर यांनी हॉर्न वाजवून साइड देण्याबाबत समोरील कारला इशारा केला.
ओव्हरटेक करून पुढे गेले. कासारी फाटा नजीक हॉटेल गुडलकसमोर गेले असताना पाठीमागे राहिलेल्या कारचालकाने बोरकर यांच्या कारला त्यांची कार आडवी लावत एकूण पाच जणांनी बोरकर व त्यांच्या भावांस बेदम मारहाण केली.