बॉलिवूड स्टार विद्युत जमवालला चीनमध्ये आयोजित जॅकी चॅन ऍक्शन मुव्ही फिल्म फेस्तिव्हलमधे दोन प्रसिद्ध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. “बेस्ट ऍक्शन सिक्वेन्स’ आणि “बेस्ट फॅमिली ऍक्शन मुव्ही’साठी परीक्षकांचे विशेष पारितोषिकही विद्युत जमलावलला मिळाला. विद्युत जमवालसाठी आणि “जंगली’ या सिनेमासाठी हा मोठा सन्मान आहे.
“द मास्क’ आणि “द स्कॉर्पियोन किंग’चे डायरेक्टर चक रसेल यांच्या हस्ते विद्युत जमवालचा सन्मान करण्यात आला. “जंगली’ हा सिनेमा वन्य प्राणी आणि मनुष्याच्या अलौकिक संबंधांवर आधारलेला आहे. विद्युत जमवाल या ऍक्शन हिरोबरोबर हत्तींनीही या सिनेमात मुख्य भूमिका वठवलेली आहे.
“कमांडो 3’चा सिक्वेल हा विद्युत जमवालचा आगामी सिनेमा असणार आहे. “कमांडो 3’मध्ये करणवीर सिंह डोग्रान या कमांडोचा रोल विद्युत जमवालने साकारली होती. तो एक गुप्तहेर असेल आणि अदा शर्मा ही त्याची साथीदार असेल. काळ्या पैशाचा माग काढण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. या पॉवरपॅक्ड ऍक्शन मुव्हीचे डायरेक्शन देवेन भोजानी यांनी तर विपुल अमृतलाल शहा यांनी केले होते.