Shreyas Talpade On Pm Narendra Modi – लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपला आव्हान देण्यासाठी कॉंग्रेसच्या नेतृत्त्वाखाली इंडिया आघाडीचा प्रयोग करुन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. विशेष म्हणजे, प्रत्येक लोकसभा निवडणुकीत चारशे पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसने यंदा मात्र मित्र पक्षांसाठी 101 जागा सोडल्या आहेत. यंदा काँग्रेस 328 जागांवर निवडणूक लढत आहे. तर, दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी ‘अबकी बार, 400 पार’चा नारा दिला आहे.
या निवडणुकीसाठी भाजपपासून काँग्रेसपर्यंत अनेक पक्षांचे प्रतिनिधी रिंगणात उभे केले आहेत. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदेनं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. श्रेयससोबतच ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनेसुद्धा गेल्या दहा वर्षांत देशाचा बराच विकास झाल्याचं म्हटलंय.
एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीला दिलेल्या या मुलाखतीत श्रेयस म्हणाला की, ‘पंतप्रधान मोदी हे गेल्या दहा वर्षांपासून देशासाठी काम करत आहेत आणि ते सर्वांत आधी देशाचा विचार करतात, म्हणून लोकांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा निवडणूक जिंकतील आणि पुन्हा देशाचा पंतप्रधान होतील, असा विश्वास त्याने व्यक्त केला आहे.
हार्ट अटॅकनंतर श्रेयस तळपदेची पहिली मुलाखत….
काही महिन्यांपूर्वीच अभिनेत्याला मुंबईत हृदयविकाराचा झटका आला होता. 47 वर्षीय श्रेयसने संपूर्ण दिवस शुटींग केली आणि त्यानंतर तो हृदयविकाराच्या झटक्याने कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. अंधेरी पश्चिम येथील शहरातील बेलेव्ह्यू रुग्णालयात अँजिओप्लास्टी करण्यात आली.
श्रेयसने आगामी ‘वेलकम टू द जंगल’साठी संपूर्ण दिवस शूट केले. त्याने दिवसभर चित्रीकरण केले, सेटवर देखील सगळ्यांशी हसून बोलत होता. त्याने थोडेसे अॅक्शन सीक्वेन्सही शूट केले.
आणि शूट संपल्यानंतर तो घरी परतला आणि त्याने पत्नीला सांगितले की त्याला अस्वस्थ वाटत आहे. तिने त्याला हॉस्पिटलमध्ये नेले पण तो वाटेतच कोसळला. जवळपास सहा-सात दिवसांनंतर श्रेयसला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला होता.