बॉलिवुडमधील बजरंगी भाई अर्थात सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मा याने गतवर्षी “लवयात्री’ चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पाउल ठेवले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपला जलवा दाखवू शकला नाही. आता आयुष आपल्या आगामी “क्वाथा’ चित्रपटाच्या तयारीत आहे. यात बॉलिवुड अभिनेत्री कतरीना कैफची छोटी बहिण इसाबेल कैफ बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे.
करण ललित भूटानी यांच्या दिग्दर्शनाखाली होत असलेल्या भारतीय लष्करातील शौर्य गाथांवरील घटनांवर हा चित्रपट आधारित आहे. यात आयुष शर्मा हा एका लष्करी अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून आयुष कठीण परिश्रम घेत आहे.
इसाबेल ही सेक्स स्कॅडलमुळे खूपच चर्चेत आली होती. एक एमएमएस सोशल मीडियावर व्हायरला झाला होता. ज्यात कॅटची बहिण इसाबेल होती. परंतु तो एमएमएस फेक असल्याचा खुलासा कतरिनाने केला होता. दरम्यान, बॉलिवुडमध्ये डेब्यू करण्याअगोदर इसाबेल 4 वर्षांपासून न्यूयॉर्कच्या एका चित्रपट इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचे प्रशिक्षण घेत होती. आता ती “क्वाथा’ चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पाउल ठेवत आहे. पण तिच्या भूमिकेबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.