मुंबई : हिंदी गुन्हेविषयक मालिकांमध्ये ‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ भूमिका साकारणाऱ्या दोन अभिनेत्रींनी मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत चोरी केली आहे. कोरोना काळात लागलेल्या लॉकडाऊनमुळे हातातलं काम गेलं. आर्थिक परिस्थती हलाखीची झाली यामुळं या दोन अभिनेत्री आरेमध्ये त्याच्या मित्राकडे गेल्या. हा मित्र पेईंग गेस्ट ठेवत असे, तिथे आधीच राहत असलेल्या पेईंग गेस्टचे पैसे यांनी चोरले. या दोन अभिनेत्रींना चोरीच्या आरोपाखाली स्थानिक पोलिसांकडून अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे की,’आरे कॉलनीतील रॉयल पाम या उच्चभ्रू इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात 18 मे रोजी त्या पेईंग गेस्ट म्हणून गेल्या. दरम्यानच्या काळात या घरात आधीपासून राहणाऱ्या पेईंग गेस्टकडे त्यांनी चोरी केली. लॉकरमध्ये ठेवलेली 3 लाख 28 हजार रुपये घेऊन त्या पसार झाल्या. याबाबत सुरभी सुरेंद्र लाल श्रीवास्तव आणि मोसिना मुख्तार शेख या दोघींनी आपले पैसे चोरल्याचा संशय तक्रारदाराने पोलिसांकडे व्यक्त केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर दोघीही इमारतीतून बाहेर पळून जाताना दिसल्या.’
‘क्राईम पेट्रोल’, ‘सावधान इंडिया’ यासारख्या गुन्हेविषयक मालिकांमध्ये भूमिका साकारणाऱ्या दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे. मुंबईतील उच्चभ्रू इमारतीत चोरी केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. कोरोना काळात मालिकांचं शूटिंग बंद असल्यामुळे दोघींची पावलं गुन्हेगारीकडे वळल्याचं दिसत आहे.
या दोघीही मुंबईमध्ये स्ट्रगलर म्हणून आल्या होत्या आणि बॉलिवूडमध्ये यांना मोठं नाव कमवायचा होतं. क्राईम पेट्रोल, सावधान इंडियासारख्या मालिकांमध्ये यांनी काम केले असून काही वेब सीरिजमध्ये सुद्धा यांनी काम केलं होतं, मात्र आता त्यांना तुरुंगवास झाला.