मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी म्हणजेच, अभिनेत्री ‘सायली संजीव’ आज महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे.
सध्या सोशल मीडियावर सायलीच्या लग्नाची चर्चा रंगू लागली आहे. सायलीच्या हळदी सेरेमनीचे काही फोटोसुद्धा व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये सायली अतिशय सुंदर दिसत आहे.
मात्र ही लगीनघाई सायलीची नसून कलर्स मराठी वाहिनीवरील मालिका “शुभमंगल ऑनलाईन’मधील शर्वरीची आहे. लवकरच शर्वरी आणि शंतनू लग्नबेडीत अडकताना दिसणार आहेत.
शुभमंगल ऑनलाईन मालिकेमध्ये शंतनूच्या प्रयत्नांना यश आले आहे. आता अखेर मालिकेत शंतनू – शर्वरी लग्नबंधनात बांधले जाणार आहेत.
शर्वरीच्या आईने म्हणजेच माधुरीने दोघांच्या लग्नास होकार दिला आहे. त्यामुळे प्रेक्षक सुद्धा शर्वरी आणि शंतनूचा विवाह सोहळा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.
अंगाला लागलेल्या हळदीमुळे शर्वरीच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत. या फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला असून, अनेक फॅन्स तिच्या प्रेमात पडले आहेत.