पुणे – पैशासाठी दोघा तरुणांचे फिल्मीस्टाईल अपहरण करुन एका तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडत त्याला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी सापळा रचून आरोपींना जेरबंद करत दोन्ही तरुणांची सुखरुप सुटका केली. आरोपींमध्ये एका सीआरपीएफच्या जवानाचाही समावेश आहे. ही कारवाई पोलिसांनी केली.
याप्रकरणी निखिल उदय गुरव (26, रा. रॅप्टेकइंजिनिअरिंग कंपनीसमोर) यांनी फिर्यादी दिली आहे. आरोपींनी प्रभात तुकाराम तोडकर आणि अजित राऊत(कोल्हापूर) यांचे अपहरण केले होते. यातील प्रभातच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले. याप्रकरणी अविनाश पांडुरंग पाटील (31,रा.गडहिंग्लज, कोल्हापूर) व उत्तम तुरंबेकर ( 31, गडहिंग्लच, कोल्हापूर) यांना अटक केली आहे.