Twinkle Khanna : अभिनेत्री ट्विंकल खन्नाने वयाच्या 50 व्या वर्षी तिचे स्वप्न पूर्ण केले आहे. अभिनय क्षेत्रात तिला फारसे यश मिळू शकले नाही. त्यानंतर तिने लिखाण करण्यास सुरूवात केली. सोशल मीडियावर ती विविध मुद्दयांवर आपले मत मांडताना दिसते. नुकतेच तिने ग्रॅज्युएशनची पदवी संपादित केली आहे. याबाबत ट्विंकलचा पती अक्षय कुमारने तिचे अभिनंदन करत तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
अक्षय कुमारची पोस्ट-
अक्षयने पोस्ट करत लिहिले की, ‘दोन वर्षांपूर्वी जेव्हा तू मला म्हणाली होतीस की तुला पुन्हा अभ्यास करायचा आहे, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटलं होतं. पण जेव्हा मी तुला त्यासाठी मेहनत घेताना पाहिलं तेव्हा मला याची जाणीव झाली की मी एका सुपरवुमनशी लग्न केलं आहे. तू घर, करिअर आणि आपल्या मुलांसोबतच एका विद्यार्थिनीच्या आयुष्यालाही उत्तमप्रकारे सांभाळले.’
‘आज तुझ्या ग्रॅज्युएशनच्या दिवशी मला असं वाटतंय की जर मी आणखी थोडा शिकलो असतो तर मला पुरेसे शब्द सुचले असते आणि मी तुला सांगू शकलो असतो की मला तुझ्यावर किती अभिमान आहे. टीना.. खूप खूप शुभेच्छा आणि आय लव्ह यू’, अशा शब्दांत अक्षयने भावना व्यक्त केल्या आहेत.
View this post on Instagram
अक्षयच्या या पोस्टवर ट्विंकलनेही कमेंट करत लिहिले की, ‘मी खूप नशीबवान आहे की मला असा जोडीदार भेटला जो मला उंच उडी मारण्यासाठी प्रोत्साहित करतो. पण मी पडले तरी तो मला उचलण्यासाठी नेहमीच तयार असतो आणि मी बऱ्याच वेळा पडते, नाही का? उद्या 23 वर्षे पूर्ण होणार आहेत’, असं तिने म्हटले आहे. ट्विंकलनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत.
ट्विंकल खन्नाने लंडन विद्यापीठातील गोल्डस्मिथ्समधून फिक्शन लेखनाचा अभ्यास पूर्ण केला आहे. गेल्या वर्षी, तिने चाहत्यांना तिच्या विद्यापीठाची व्हिडिओ टूर आणि तिचे विद्यार्थी जीवन कसे आहे हे दाखवले होते. त्यानंतर आता तिने ग्रॅज्युएशनची डिग्री देखील संपादित केली आहे.