Bigg Boss 17: टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय शो ‘बिग बॉस 17’ (Bigg Boss) मध्ये दररोज नवीन ड्रामा पहायला मिळत आहे. यंदाच्या शोमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी देखील सहभागी झाले आहेत. परंतु हा शो सुरू झाल्यापासून त्यांच्यात नेहमीच वाद होत असल्याचे पाहायला आहे. नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये विकीच्या आईची बिग बॉसच्या घरात एंट्री झाली होती. यावेळी त्यांनी अंकिताला ‘बिग बॉस’च्या घरात येऊन सुनावलं होतं.
यावरून विकीच्या आईला ट्रोलही करण्यात आले होते. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी अंकिताला पाठिंबा दिला आहे. अभिनेत्री सनी लिओनीने देखील अंकिताला पाठिंबा देत तिच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. सनीने अंकितासाठी ट्वीट करत लिहिले की, “बिग बॉस 17च्या फायनलसाठी ऑल द बेस्ट अंकिता. मी नेहमीच तुझ्याबरोबर आहे.” याबरोबरच तिने #AnkitaLokhande आणि #AnkitalsTheBoss हे हॅशटॅगही वापरले आहेत. सनीने अंकितासाठी केलेलं हे ट्वीट व्हायरल झाले आहे.
All the best @anky1912 for #BB17 finale ..I am rooting for you girl!! 😘
.
.#AnkitaLokhande #AnkitalsTheBoss— Sunny Leone (@SunnyLeone) January 16, 2024
दरम्यान, अंकिता ‘बिग बॉस 17’चा विजेतेपदाची दावेदार मानली जात आहे. ‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अंकिताने सिनेमांतही काम केलं आहे. 2021 साली अंकिताने विकीबरोबर लग्न करत संसार थाटला. परंतु ‘बिग बॉस’च्या घरातील वादामुळे त्यांच्या नात्यात दुरावा आल्याचे पाहायला मिळत आहे. याआधीही रितेश देशमुख, रश्मी देसाई यासारख्या अनेक कलाकारांनीही तिला पाठिंबा दर्शवला होता.
काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या घरात ईशा मालवीया आणि समर्थ जुरेल यांचा रोमान्स सुरू होता. त्यांच्या रोमान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर संताप व्यक्त केला होता. त्यामुळे हा शो कोणत्या न कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळते.