राजधानी बगदाद पुन्हा एकदा बॅम्बस्फोटांनी हादरली; 28 ठार

बगदाद – इराकची राजधानी बगदाद पुन्हा एकदा बॉम्बस्फोटांनी हादरली आहे. बगदादमध्ये झालेल्या आत्मघातकी बॉम्बस्फोटात 28 जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आहे. तर 73 जण या स्फोटामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे.

पोलीस आणि वैद्यकीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका व्यक्तीनं बॉम्ब स्वत:च्या शरिरावर लावून बगदादमधील बाजारात प्रवेश केला आणि स्फोट घडवून आणला. ही घटना बगदादमधील तायरण चौकात घडली आहे.

पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची शक्‍यता असल्याची माहिती दिली आहे. स्फोटातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याचं वृत्त रीट्रस या वृत्तसंस्थेने दिले आहे. बगदादमध्ये आज झालेला अतिरेकी हल्ला 2017 नंतरचा सर्वात मोठा हल्ला आहे. इराकमधील या हल्ल्याची आतापर्यंत कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही.

इराकमधील मोसूल जवळ रविवारी 17 जानेवारीला बॉम्बस्फोट झाला होता. त्या अतिरेकी हल्ल्यामध्ये 6 सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांचा आणि एक नागरिक अशा 7 जणांचा मृत्यू झाला होता. चार दिवसांतच दुसरा बॉम्बस्फोट झाल्यामुळे इराकमधील सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.