डोनाल्ड ट्रम्प यांनी मोडली 152 वर्षांची परंपरा ; पाहा काय केलं

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांचा बुधवारी शपथविधी सोहळा पार पडला. त्यांच्यासोबत कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली. अमेरिकन संसदेसमोर राष्ट्राध्यक्षांचा शपथिविधी सोहळा पार पडला. यावेळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष माइक पेन्स उपस्थित होते. परंतु मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला हेका कायम ठेवत शपथविधी सोहळ्याकडे पाठ फिरवली. ट्रम्प यांच्या या कृत्याने 152 वर्षांचा इतिहास मोडित निघाला.

जो बायडेन यांच्या शपथविधीला न जाण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी 8 जानेवारीलाच केली होती. खरं तर अमेरिकेत पुढील अध्यक्षाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची परंपरा आहे. ही परंपरा माजी राष्ट्राध्यक्ष जॉन ऍडम्स यांनी पहिल्यांदा तोडली होती. त्यानंतर ट्रम्प हे अशी परंपरा खंडित करणारे चौथे अध्यक्ष ठरले आहेत.

अमेरिकेचे पहिले उपाध्यक्ष आणि दुसरे अध्यक्ष जॉन ऍडम्स होते. अमेरिकेच्या नव्या गणराज्याच्या स्थापनेत त्यांचा मोलाचा वाटा आहे. यापूर्वी फेडरलिस्ट पक्षाचे उमेदवार असलेले जॉन ऍडम्स आणि डेमोक्रेटिक-रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार थॉमस जेफरसन यांच्यामध्ये अध्यक्षपदाची निवडणूक झाली होती. त्यामध्ये जेफरसन यांनी बाजी मारली. परंतु ऍडम्स शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहिले नव्हते. इतकंच काय, तर व्हाईट हाऊसमधील कर्मचारीही अनुपस्थित होते.

जॉन क्वीन्सी ऍडम्स 1825 ते 1829 या काळात अमेरिकेचे अध्यक्ष होते. 1829 च्या निवडणुकीत ऍडम्स आणि अँड्रयू जॅक्‍सन यांच्यात जोरदार लढत झाली होती. अँड्रयू यांना पॉप्युलर वोट्‌स मिळाले, परंतु कुठल्याच उमेदवाराला इलेक्‍टोरल वोट्‌समध्ये बहुमत मिळालं नाही. मात्र पारडं जड ठरल्याने अँड्रयू जॅक्‍सन विजयी झाले. तत्कालीन मावळते अध्यक्ष जॉन क्वीन्सी ऍडम्स हे जॅक्‍सन यांच्या शपथविधीच्या एक दिवस आधीच वॉशिंग्टन सोडून गेले.

अमेरिकेच्या जवळपास दीडशे वर्षांच्या इतिहासात जॉन्सन यांच्यानंतर कोणीच उत्तराधिकाऱ्याच्या शपथविधीला जाणं टाळलं नाही. राजकीय सुसंस्कृतपणाचं हे लक्षण मानलं जातं. मात्र ही परंपरा तोडत डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला गैरहजेरी लावली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.