लोणंद – अज्ञानाचा फायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करून सहा महिन्यांची गर्भवती होण्यास कारणीभूत ठरलेला आरोपी उमेश रमेश रासकर (वय 25 रा. लोणंद) याला बारा वर्षे शिक्षा व एक लाख 25 हजार रूपये दंड अशी शिक्षा विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली. हा गुन्हा लपवण्याच्या प्रयत्न करून पोलिसांना खोटी माहिती देण्यास भाग पाडले म्हणून आरोपीची आई सुभद्रा रमेश रासकर (वय 50 रा. लोणंद) हिला न्यायालयाने तीन महिन्यांची शिक्षा व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, पोलिस हवालदार भीमराव पवार, पोलिस नाईक कोलवडकर, पोलिस हवालदार तोडलमर यांनी करून विशेष जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला व्ही. बी. पारगावकर यांच्या कोर्टात चालू होता. सरकारी पक्षातर्फे ऍड. आशीर्वाद कुलकर्णी यांनी व प्रॉस्युुकेशन म्हणून सहायक पोलिस फौजदार पवार व एस. जे. पोळ यांनी काम पाहिले.