मुंबई – “कसौटी जिंदगी की’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या अभिनेता प्राचीन चौहान यालामुंबईतल्या मालाड पोलीसांनी विनयभंगाच्या आरोपाखाली अटक केली आहे. तरुणीसोबत लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप प्राचीन चौहानवर करण्यात आला आहे.
प्राचीनने कसौटी जिंदगी की या मालिकेतून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. या मालिकेत त्यानं सुब्रको बसू ही व्यक्तीरेखा साकारली होती. त्यानंतर तो स्वर्ग, सिंदूर यासारख्या टीव्ही सिरीअलमध्ये झळकला होता.
दरम्यान, रुणीनं तक्रार केल्यानंतर प्राचीन विरोधात पोलिसांनी IPC कलम 354, 342, 323 आणि 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे.