लोहगड, पवनमावळ – रिमझिम पावसामुळे सह्याद्रीच्या डोंगररांगा हिरवाईने नटल्या आहेत. मनोहरी दृश्य पर्यटकांना नेहमीच भावते. ढगाळ वातावरण, कधी उनं-पावसाचा खेळ आणि गर्द झाडीतून डोकावणारे महागाव मन प्रफुल्लित करते. विसापूर किल्ल्यावरून दिसणारे पवना धरणाचे पाणलोट क्षेत्र आणि समोर तुंग किल्ला इतिहासाची साक्ष देते. निसर्गाचा मनोहरी क्षण टिपला आहे दै. ‘प्रभात’चे वाचक प्रवीण दशरथ हुलावळे यांनी.