एसआयपीची लोकप्रियता वाढली

नवी दिल्ली – म्युच्युअल फंडामध्ये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे एसआयपीच्या माध्यमातून जानेवारी ते जून या सहा महिन्यांत 50 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

गेल्या वर्षाच्या या सहा महिन्यांच्या तुलनेमध्ये ही वाढ 3 टक्‍के जास्त आहे. या काळात करोना व्हायरसचा जास्त प्रादुर्भाव झाला होता. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या महिन्यांमध्ये ही गुंतवणूक जास्त होती. त्यानंतर यामध्ये थोडी घट होऊ लागली आहे. म्युच्युअल फंडाकडे सध्या 3 कोटी 23 लाख खातेदार आहेत. गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडातील किरकोळ गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढत आहे. भारतात सध्या 45 म्युच्युअल फंड कंपन्या आहेत.

फंडातील बरीच गुंतवणूक शेअरबाजाराकडे जाते. म्युच्युअल फंडामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना आठवड्याच्या, महिन्याच्या आणि तिमाहीच्या पातळीवर गुंतवणूक करता येते. त्यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना या क्षेत्रात गुंतवणूक करणे अतिशय सोयीचे जाते. म्युच्युअल फंड उद्योगाने आपला ब्रॅंड तयार करण्याकरिता आकर्षक जाहिराती केल्या आहेत. त्याचा या उद्योगाला बराच लाभ होत असल्याचे वातावरण आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.