मुंबई : राज्यात ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिनाचा उत्साह पाहायला मिळाला. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर प्रत्येक जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रत्येक देशवासी 75 व्या स्वातंत्र्यदिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो आहे.अशात मुंबईत मंत्रालयासमोर एक धक्कादायक प्रकारने मुंबईमध्ये खळबळ उडाली.
जळगाव येथे राहणाऱ्या शेतकऱ्याने मंत्रालयासमोर अंगावर रॉकेल टाकत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान लगेचच पोलिसांनी हा प्रकार थांबवण्याचा प्रयत्न करत या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे.
मंत्रालयाच्या समोर पोलिस बंदोबस्त असताना देखील एका शेतकऱ्यांने स्वत:ला आग लावून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
सुनील गुजर असं या शेतकऱ्याचं नाव आहे. मका, सोयाबीन, व्यवहार , घर गहाण असल्यामुळे स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांने केल्याचं कळत आहे.