नवी दिल्ली – ब्रिटीश गुप्तहेराविरोधात अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दाखल केलेली बदनामीची याचिका लंडनमधील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. आपल्याविरोधात खळबळजनक आणि धक्कादायक दावे या गुप्तहेराने केले.
हे सर्व दावे खोटे असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे या गुप्तहेराने आपली बदनामी केली असल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला होता. ओर्बिस बिजनेस इंटेलिजन्स विरोधात ट्रम्प यांनी केलेल्या अर्जावर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला.
या कंपनीची स्थापना क्रिस्टोफर स्टीलने केली होती, त्यांनी २०१६ मध्ये ट्रम्प यांच्याविरोधात अफवा आणि अप्रमाणित आरोप होते ज्यामुळे ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या शपथविधीपूर्वी राजकीय वादळ निर्माण झाले होते.