पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूलला धक्का; भाजपला 14 जागांचे ओपनिंग

कोलकाता – तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांवर सातत्याने केलेल्या तिखट टीकेमुळे पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभेची निवडणुक अधिकच लक्षवेधी ठरली होती. मात्र पंतप्रधानांच्या जरा जास्तीच्या प्रचारामुळे भाजपने पश्‍चिम बंगालमध्ये 42 पैकी 14 जागांचे ओपनिंग मिळवले. राज्य सरकार ताब्यात असलेल्या तृणमूल कॉंग्रेसला 19 जगांवर स्वस्थ बसावे लागले. तर अन्य ठिकाणी कॉंग्रेस, डावे आणि अपक्षांनी आपापल्या ताकदीनुसार विजय मिळवले अहेत. कॉंग्रेसला याठिकाणी भाजप आणि ममता बॅनर्जींच्या तृणमूलच्या विरोधातही लढावे लागले होते. येथे कॉंग्रेसला 2 जागांवरच समाधान मानावे लागले.

केंद्रीय राज्य मंत्री बाबुल सुप्रियो यांनी आसान्सोल्‌ मतदारसंघातून 31 हजार मतांनी विजय मिळवला. त्यांनी अभिनेत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या मुनमून सेन यांचा पराभव केला. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी डायमंड हार्बर मतदारसंघातून अवघ्या 17 हजार मतांनी विजय मिळवला. विद्यमान खासदार असल्याने त्यांनी आपली जागा कायम राखली आहे.

कोलकाता उत्तर मतदारसंघातून दोन वेळेस खासदाऱ्‌ म्हणून निवडून आलेल्या तृणमूल कॉंग्रेसच्या सुदीप बंडोपाध्याय यांनी जांगिपूर मतदारसंघातून भाजपच्या राहुल सिन्हा यांच्यावर 8 हजार मतांनी विजय मिळवला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव अभिजीत मुखर्जी यांनी 2017 च्या निवडणुकीमध्ये याच मतदारसंघातून अवघ्या 8 हजार मतांनीच विजय मिळवला होता.

प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या दक्षिण कोलकाता मतदारसंघातून तृणमूलच्या माला रॉय यांनी भाजपच्या चंद्र बोस यांच्यवर 44 हजार मतांनी विजय मिळवला. चंद्र बोस हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भाचे आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.