शेअर निर्देशांकांत घट

मुंबई – गुरुवारी जरी रालोआला पूर्ण बहुमत मिळाले असले तरी शेअरबाजार निर्देशांकांत मात्र काही प्रमाणात घट नोंदली गेली. बहुमत मिळणार असल्याच्या शक्‍यतेमुळे गेल्या आठवड्यापासूनच शेअरबाजार निर्देशांकात मोठी वाढ झाली होती. त्यामुळे आता आणखी वाढ होण्यास फारसा वाव नाही हे ध्यानात आल्यानंतर गुरुवारी गुंतवणूकदारांनी विक्री केल्याचे
दिसून आले.

तरीही सकाळी निर्देशांक मोठ्या प्रमाणात वाढले होते. नंतर दिवसभर नफेखोरी होत गेली. बाजार बंद होताना सेन्सेक्‍स 298 अंकांनी कमी होऊन 38,811 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर विस्तारीत पाया असलेल्या राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 80 अंकांनी कमी होऊन 11,657 का वर बंद झाला.

सेंट्रम मालमत्ता व्यवस्थापन संस्थेचे रोखे विभाग प्रमुख देवांग मेहता यांनी सांगितले की, स्थिर सरकार येणार म्हणून गुंतवणूकदारांनी अगोदरच खरेदी करून ठेवलेली आहे. आता एनबीएफसीमधील भांडवल सुलभतेचा प्रश्न, मान्सूनची वाटचाल, व्यापार युद्ध या बाबींचा विचार करून गुंतवणूकदार निर्णय घेण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर वाढणारे क्रुडचे दर आणि व्यापारयुद्धाकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष राहील. गुरुवारी माहिती-तंत्रज्ञान, धातू आणि ग्राहक वस्तू क्षेत्राचे निर्देशांक कमी झाले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×