नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांच्या लोकसभेतून करण्यात आलेल्या हकालपट्टीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पुढील वर्षी 3 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. महुआंना अपात्र ठरवण्याची शिफारस संसदेच्या आचार समितीने केली आहे, पण ही शिफारस करताना त्यांनी योग्य प्रक्रियेचाअवलंब केला नाही व मनमानी पद्धतीने निर्णय दिला असा त्यांचा आक्षेप आहे.
आज त्यांची याचिका सुनावणीसाठी घेण्यात आली. हे प्रकरण सुनावणीसाठी घेण्यात येताच, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठाने मोईत्राची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील अभिषेक सिंघवी यांना सांगितले की, आम्ही अजून खटल्याच्या फायली तपासल्या नाहीत आणि त्याचा अभ्यास केल्यानंतर ३ जानेवारीला त्याची सुनावणी केली जाईल. महुआ यांच्या अपात्रतेच्या शिफारशीवर संसदेत चर्चा झाली त्यावेळी महुआंना बोलू दिले गेले नाही.