Mahua Moitra Vs Rajmata Amrita Roy| लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने रविवारी 111 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. यात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या कृष्णानगर मतदार संघातून भारतीय जनता पार्टीने राजमाता अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. येथे त्यांची तृणमूल कॉंग्रेसच्या वादग्रस्त आणि अपात्र ठरवण्यात आलेल्या खासदार महुओ मोईत्रा यांच्याशी टक्कर होणार आहे.
भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांनी अगोदरच अमृता रॉय यांना उमेदवार केले जाण्याबाबत स्वारस्य दाखवले होते. त्यानंतर रॉय यांच्याशी पक्षाने चर्चा सुरू केली आणि आता त्यांना उमेदवारी देण्यात आली. हा मतदारसंघ पश्चिम बंगालमधील काही अत्यंत महत्वाच्या मतदारसंघांपैकी एक मानला जातो. त्यामुळे राजमाता अमृता रॉय आणि महुओ मोईत्रा यांच्यात कोण विजयी होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कोण आहेत राजमाता अमृता रॉय? Mahua Moitra Vs Rajmata Amrita Roy|
अमृता रॉय या कृष्णानगरच्या प्रख्यात राजबाडीच्या (रॉयल पॅलेस) राजमाता आहेत. त्यांना उमेदवारी दिली जाण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या. त्यांनी २० मार्च रोजीच भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. बंगालमधील विरोधी पक्षनेते सुवेंदु चौधरी यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश सोहळा झाला होता.
नादिया जिल्ह्याच्या इतिहासात राजा कृष्णचंद्र यांचे योगदान सुपरिचित आहे. कृष्णानगर येथील राजपरिवाराचे आजही स्मरण केले जाते. अमृता रॉय यांच्या उमेदवारीमुळे भारतीय जनता पार्टीला येथे फायदा होण्याची शक्यता आहे.
महुआ मोइत्रा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजयी Mahua Moitra Vs Rajmata Amrita Roy|
टीएमसी नेत्या महुआ मोइत्रा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कृष्णानगर मतदारसंघातून भाजपचे कल्याण चौबे यांचा पराभव करत त्या विजयी झाल्या होत्या. त्यांना 6,14,872 मते मिळाली होती. तर भाजपचे कल्याण चौबे यांना 551654 मतं मिळाली होती.
हेही वाचा:
“प्रकाश आंबेडकर सोबत नसले तरीही…”; मविआ-वंचित युती तुटली?, संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण