मंगळुरू – हैदराबाद येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओ मध्ये नोकरी करणाऱ्या एका तरुण वैज्ञानिकाने दक्षिण कन्नड जिल्ह्यातील राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती उघड झाली आहे.
भरत (२४) असे मृताचे नाव आहे, तो गेल्या दोन महिन्यांपासून डीआरडीओमध्ये तात्पुरत्या स्वरूपात काम करत होता.भरतने नोकरीचा राजीनामा दिला आणि तो एका आठवड्यापूर्वी दक्षिण कन्नड जिल्ह्यातील पुत्तूर तालुक्यातील आर्यपू गावात परतला.
मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी डीआरडीेओच्या वतीने त्याला कामावर येण्यासंबंधी फोन आला होता.हा फोन आल्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. रात्री उशिरा त्याने आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती गुरुवारी घरच्यांना समजली.