मुंबई – सारा अली खान चित्रपटांसोबतच तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करते. अभिनेत्री बर्याचदा सोलो व्हेकेशनवर जाऊन तिचा टाइम एन्जॉय करताना दसते. सारा काही दिवसांपूर्वी हिमाचलमध्ये सुट्टी घालवत होती. तर, आता ती पंजाबमध्ये पोहोचली आहे. साराने तिच्या व्हेकेशनची झलक इंस्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
सारा अली खानच्या पंजाब व्हेकेशनच्या व्हिडीओने इंस्टाग्रामवर धुमाकूळ घातला आहे. या क्लिपमध्ये अभिनेत्री महागडी वाहने सोडून चक्क ऑटो रिक्षाचा आनंद घेताना दिसत आहे. यासोबतच चंदीगडमध्ये तिने थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या पराठ्यांचा आस्वाद घेतल्याचे पाहायला मिळते. नो-मेकअप लूकमध्येही साराचा चेहरा आणखीनच सुंदर दिसत आहे.
साराच्या या साध्य ऍक्टिव्हिटीमुळे चाहते तिचे खूप कौतुक करत आहेत. सारा इतर अभिनेत्रींप्रमाणे केवळ ग्लॅमरच्या मागे न धावत जमिनीवर राहून काम करत असल्याचे तिच्या फॅन्सचे म्हणणे आहे. अनेकांना साराचा हा नो मेकअप लूक चांगलाच आवडला आहे.
View this post on Instagram
सारा अली खानच्या कामाबाबत बोलायचे झाले तर ती लवकरच विक्रांत मॅसी आणि चित्रांगदा सिंगसोबत ‘गॅसलाइट’ चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती ‘मेट्रो इन दिनन’ या चित्रपटात देखील काम करत आहे. यामध्ये तिच्यासोबत अली फजल आणि आदित्य रॉय कपूर सारखे स्टार्स असणार आहेत. तसेच ‘द इमॉर्टल अश्वथामा ‘मध्ये सारा विकी कौशलसोबत दिसणार आहे.