मुंबई – सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या आयुष्याशी संबंधित तपशील शेअर करते. नुकतंच साराने तिचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये ती मुंबई मेट्रोमध्ये प्रवास करताना दिसत आहे. विशेष म्हणजे यावेळी अगदी सर्वसामान्यांप्रमाणे अभिनेत्रीने मेट्रोतून प्रवास केल्याचे पाहायला मिळत आहे.
दिल्लीप्रमाणेच मुंबईही मेट्रो सिटी झाली आहे. गेल्या काही महिन्यांत अनेक सेलिब्रिटी मेट्रोने प्रवास करताना दिसले आहेत. नुकताच हेमा मालिनी यांचा देखील मेट्रोमधील एक व्हिडिओ समोर आला होता. अशात आता सारा अली खाननेही मेट्रोच्या या प्रवासाचा आनंद घेतला आहे. याबाबतची माहिती स्वतः साराने आपल्या सोशल मीडियावरून दिली आहे.
यावेळी साराने पांढरा,गुलाबी रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातला आहे.मेट्रोमध्ये ट्रॅव्हल करताना सारा खूप आनंदी असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी तिने सोबत एक हॅंडबॅग देखील कॅरी केल्याचे पाहायला मिळत आहे. सेलिब्रेटी अंदाज सोडून सर्वसामान्यांप्रमाणे साराने केलेला हा प्रवास चाहत्यांना देखील आवडला आहे. यावेळेसचा फोटो पोस्ट करत साराने मुंबई मेरी जान असं कॅप्शन त्याला दिल आहे.
सारा अली खान सध्या अनुराग बासूच्या ‘मेट्रो इन दिनो’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आदित्य रॉय कपूर दिसणार आहे. यावेळी केलेल्या पोस्टमध्ये साराने अनुराग बासू आणि आदित्य रॉय कपूरला टॅग करत म्हणतात आहे,’मला विश्वास नव्हता की मी तुमच्या आधी मेट्रोने ट्रॅव्हल करेल’.